Indian Premier League 2024, SRH vs MI : – आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांने सामन्यादरम्यान घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्याच्यावर टीका देखील करण्यात आली. मात्र यावर आता संघ व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण आले आहे.
यावर बोलताना मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक कॅरन पोलार्डने जसप्रीत बुमराहऐवजी हार्दिकने #HardikPandya गोंलदाजीची सुरुवात करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. गुजरात टाइटन्स विरोधात झालेल्या या सामन्यात हार्दिकला फलंदाजीसाठी सातव्या नंबरला पाठवायचे हा देखील सामूहिक निर्णय होता, असेही पोलार्डने सांगितले.
मुंबईने गुजरात विरोधात खेळलेल्या या सामन्यात ज्या प्रकारची रणनिती बनवली होती, त्यामुळेच त्यांचा पराभव झाला अशी टीका करण्यात येत आहे. हा सामना मुंबई इंडियन्स सहज जिंकेल असं वाटत असतानाच त्यांचा 6 धावांनी पराभव झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बुमराहऐवजी हार्दिकने पहिले षटक टाकले. होते.