Mumbai Indians Fans Troll Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने रविवारी (24 मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना 6 धावांनी गमावला. हार्दिकचे कर्णधारपद मुंबईसाठी पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. सामन्यादरम्यान चाहते हार्दिकवर अजिबात खुश दिसत नव्हते. हार्दिकला पाहून कधी रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी झाली, तर कधी मुंबईच्या कर्णधाराला ‘छपरी-छपरी’ असे संबोधले गेले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्टेडियमच्या स्टँडमध्ये बसलेले प्रेक्षक हार्दिक पांड्याला ‘छपरी-छपरी’ म्हणताना दिसत आहेत. हार्दिक मुंबईचा कर्णधार झाल्यापासून त्याला चाहत्यांकडून द्वेषाचा सामना करावा लागत आहे. आता लाइव्ह मॅचमध्येही चाहत्यांनी त्याच्याबद्दल द्वेष व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.
Ahmedabad crowd calling Hardik Pandya ‘chhapri’ 😳 #ipl #HardikPandya #chapri #GTvMI pic.twitter.com/0QKEgHZrJY
— Lalit Kumar (@Lalit96L) March 25, 2024
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, हार्दिक ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात आहे आणि त्याला जाताना स्टेडियमध्ये बसलेले चाहते ‘छपरी-छपरी’ असे ओरडू लागतात . मात्र, मुंबईचा कर्णधार थेट निघून जातो आणि घोषणांवर प्रतिक्रिया देत नाही. पण हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. आयपीएलच्या इतिहासात असे क्वचितच घडले आहे जेव्हा चाहत्यांनी भारतीय खेळाडूवर असा राग काढला असेल.
Hardik Pandya bodied here by Rohit Sharma fans . Crowd chanting Chapri Chapri #chapri #HardikPandya
— Furkan (@tweetbyfurkan) March 25, 2024
मुंबईचा 6 धावांनी पराभव …
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-live-cricket-score-gt-vs-mi-indian-premier-league-2024-gujarat-gave-mumbai-a-target-of-169-runs-jasprit-bumrah-took-three-wickets/
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या होत्या. साई सुदर्शनने संघासाठी 45 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला 20 षटकांत 9 गडी बाद 162 धावाच करता आल्या. माजी कर्णधार रोहित शर्माने संघासाठी 43 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. मात्र, रोहितची खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही.