नवी दिल्ली- लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज लखनऊच्या एकना स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 45 वा खेळवला जाणार आहे. हा सामना 4 मे ला होणार होता. परंतु लखनऊमधील निवडणुकांमुळे हा सामना आदल्या दिवशी म्हणजेच 3 मे ला आयोजित करण्यात आला आहे.
आयपीएलच्या इतिहासात लखनऊ आणि चेन्नईचा दोन वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी एक सामना लखनऊच्या संघाने जिंकला आहे. तर, एका सामन्यात चेन्नईच्या संघाने विजय मिळवला आहे. यंदाच्या हंगामात लखनऊ आणि चेन्नईचा संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतंय हे बघणं महत्वाचे ठरेल.
असे आहेत दोन्ही संघ…
लखनऊ सुपर जायंट्स-
काइल मेयर्स, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (विकेटकिपर), क्रुणाल पंड्या, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, यश ठाकूर, आयुष बदोनी, आवेश खान, डॅनियल सॅम्स, क्विंटन डी कॉक, प्रेरक मांकड, मनन वोहरा, मार्क वुड, जयदेव उनाडकट, स्वप्नील सिंग, मोहसिन खान, रोमॅरियो शेफर्ड, अर्पित गुलेरिया, युद्धवीर सिंह चरक, करण शर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज संघ-
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश तिक्ष्णा, आकाश सिंह, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन प्रिटोरियस सेनापती, आर.एस. हंगरगेकर, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंह, भगत वर्मा, निशांत सिंधू.