मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत व शिवसेनेदरम्यान रंगलेले असतानाच आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तिच्या पाली येथील कार्यालयाची पाहणी करण्यात येत आहे. कंगनाचे पाली येथील कार्यालय अनधिकृत तर नाही ना याचा शोध महापालिका कर्मचाऱ्यांकडून घेतला आत असल्याचे समजते.
तत्पूर्वी, ‘मी मुंबईला येतेय. हिंमत असेल तर रोखून दाखवा,’ असं आव्हान कंगनाने शिवसेनेला दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारतर्फे कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा सुपूर्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर असून पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. याच कार्यालयाची आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी कार्यालय अनधिकृत तर नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी केल्याचे समजते.
कंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्याचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. कार्यालयाशेजारील बंगल्यांची देखील पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी रस्त्यांचीही मापं घेतली.
आता या सर्व तपासणीनंतर पालिका काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.