लोणी धामणी -आंबेगाव तालुक्यातील लोणी, वडगावपीर परिसरात लॉकडाऊचा पाचवा टप्पा शिथील झाला आणि भुरट्या चोरांचा उपद्रव सुरू झाला आहे.
वडगावपीर येथील संभाजी आदक यांच्या घराजवळील शेडमधून (दि.6) रात्री मोटारसायकल चोरीला गेली, तर लोणी येथील विठ्ठलवाडी येथील भाऊ होले यांच्याही घराजवळून रात्री मोटारसायकल चोरीला गेली आहे. दोघांच्या मोटारसायकल नवीन खरेदी केल्या असून, अंदाजे प्रत्येकी किंमत 80 हजार रुपये आहे.
दरम्यान, लोणी येथील खंडागळे वस्ती येथील शेतकरी एकनाथ खंडागळे यांच्या शेतातील शेततळ्याचा निम्मा कागद चोरांनी कापून नेल्याने नव्वद हजारांचे नुकसान झाले आहे. तिघांनीही मंचर पोलीस स्टेशन अंकित लोणी येथील बीट पोलीस चौकीत तक्रार दाखल केली असून, येथील बीट जमादार विलास साबळे पुढील तपास करीत आहे.