सेंट जाॅहन्स : वेस्ट इंडिज संघाने गुरूवारी पुढील महिन्यापासून सुरू होणा-या भारताविरूध्दच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठीचा संघ जाहीर केला. तीन सामन्यांची टी-२० मालिका ६ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
टी-२० मालिकेतील पहिली टी-२० लढत ६ डिसेंबर(हैदराबाद), दुसरी लढत ८ डिसेंबर(तिरूअनंतपुरम) तर तिसरी लढत ११ डिसेंबरला (मुंबई) होणार आहे.
विंडीज टी-२० संघ – कायरन पोलार्ड ( कर्णधार), अॅलन, किंग, दिनेश रामदिन, कोट्रेल, लुइस, रूदरफोर्ड, हेटमायर, पिएर, सिमन्स, होल्डर, हायडेन, पाॅल, पूरन, विल्यम्स.
एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १५ डिसेंबरला (चेन्नई), दुसरा सामना १८ डिसेंबरला( आणि तिसरा सामना २२ डिसेंबरला (कटक) होणार आहे.
विंडीज एकदिवसीय संघ – कायरन पोलार्ड ( कर्णधार), सुनील अम्ब्रीस, शाय होप, पीएर, रोस्टन चेस, जोसेफ, शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमराॅन हेटमायर, एव्हिन लुइस, शेफर्ड, होल्डर, किमो पाॅल, हायडेन.