नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शिक्षकांच्या राजकारणात व जडणघडणीमध्ये पारनेर तालुक्याने नेहमी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. शिक्षक संघाच्या वाटचालीमध्ये पारनेर तालुक्याला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच पारनेर तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षक संघाबरोबर राहण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य असा निर्णय असून भविष्यामध्ये शिक्षक संघाच्या वाटचालीमध्ये पारनेर तालुक्यातील शिक्षक बांधवांना पूर्वीप्रमाणेच महत्त्व राहील. शिक्षक संघाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये संघाची ताकद वाढली असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने शिक्षक संघाचे जिल्ह्यात शिवधनुष्य पेलण्याची शक्ती मला मिळाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हासंघाचे प्रभारी अध्यक्ष तथा गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी केले.
शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरून गेल्या काही दिवसापूर्वी मतभेद निर्माण झाल्यानंतर गुरुमाऊली मंडळात दोन गट पडले. त्यापैकी एका गटाने शिक्षक परिषद या संघटनेशी जवळीक साधली. परंतु पारनेर तालुक्यातील अनेक शिक्षकांना हा निर्णय मान्य नव्हता. शिक्षक संघाची धुरा पारनेर तालुक्यातील अनेक दिग्गजांनी आत्तापर्यंत सांभाळलेली आहे. संघाच्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये पारनेर तालुक्यातील जुन्या जाणत्या लोकांनी मोलाचे योगदान दिले आहे. संघ राज्यातील शिक्षकांची सर्वात प्रभावी संघटना असून स्वार्थापोटी या संघटनेला सोडून नवीन खाजगी लोकांची संघटना धारण करणाऱ्या बरोबर जायचे नसल्यामुळे शिक्षक संघातच राहण्याचा निर्णय पारनेर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांनी घेतला. काल पारनेरमधील शिक्षक बँकेशेजारील सुगंधाबाई सभागृहात तालुक्यातील प्रमुख शिक्षक कार्यकर्त्यंची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये तांबे बोलत होते. शिक्षक बँकेचे चेअरमन साहेबराव अनाप, आर. टी. साबळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांनी नगर जिल्ह्यातील शिक्षक संघामध्ये फूट पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. पारनेर मधील नेत्यांना राज्यात संधी देण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. मात्र स्वार्थाने आंधळ्या झालेल्या लोकांनी शिक्षक संघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. सासवड अधिवेशनाचे पैसे हडप केले. संघांमध्ये आपल्याला जिल्हाध्यक्षपद मिळणार नाही म्हणून नवी संघटना धारण केली. परंतु त्यांचा हा निर्णय पारनेर तालुक्यातील शिक्षकांना मान्य नसल्यामुळे आज त्यांनी महत्त्वाची बैठक घेऊन तालुक्यातील सर्व शिक्षक हे शिक्षक संघाच्या झेंड्याखाली काम करणार, बापूसाहेब तांबे हे सुद्धा पारनेर तालुक्याचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सालके, कार्याध्यक्ष आबासाहेब दळवी, सरचिटणीस सूर्यकांत काळे, संघाचे सरचिटणीस बाळासाहेब दिघे, कोषाध्यक्ष अंबादास तांबे, विशाल उमाप, जिल्हा प्रतिनिधी अनिल पारधी, मंगेश खिलारी, सुयोग पवार, सुरेश निवडूंगे, सचिन नाबगे, लहू थोरात, विशाल खरमाळे, पंचशील साळवे, भाऊसाहेब क्षीरसागर, जयवंत ठाणगे, बाळासाहेब पुजारी, विशाल उमाप, गणेश तांबे, प्रल्हाद भालेकर, अरूण कोरडे, बाळासाहेब दिघे, विजय दावभट, चंद्रकांत गट, सचिन वाटमारे, जयवंत ठाणगे, भांड, साहेबराव कदम, बाबा काटघुगे भालेकर, राहिंज, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब जराड, पोपट शिंदे, संजय गायकवाड, भालेकर, भिटे, संदीप गायकवाड, रामदास चौरे, संभाजी चत्तर यासह तालुक्याच्या विविध भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.