नगर – महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत वाढदिवसाचे फलक लावल्याने संबंधितावर मनपाने तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. मात्र, आज पुन्हा त्या ठिकाणी अनधिकृत फलक लावले आहेत. मनपा संबंधितावर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक साबळे हे प्रभागात गस्त घालत असताना, नगर-औरंगाबाद रस्त्यावरील डीएसपी चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनाधिकृत वाढदिवसाचे फलक लावले असल्याने प्रभाग अधिकारी यांनी संबंधितांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत फलक लावले असल्याचे समोर आले आहे. याबाबत मनपा गुन्हे दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.