अहमदनगर : कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी पाठिंबा दिला आहे. आज रात्री 9 वाजता घरातील वीज बंद करून 9 मिनिटं मेणबत्ती, टॉर्च, दिवे, पणती लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यावर इंदोरीकर महाराज यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत पंतप्रधानच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला असून, तसेच शासनाच्या नियमाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वानी घरातच राहा मी सुद्धा घरीच राहतो. प्रवास टाळा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका से ते म्हणाले.
दरम्यान इंदोरीकर महाराज यांनी कोरोनाला हरवण्यासाठी १ लाखाचा धनादेश संगमनेरच्या तहसीलदारांकडे सुपूर्त केला आहे, तसेच गरिबा कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप केले आहे.