नीलकंठ मोहिते
“नको रे बाबा निवडणूक’
आम्ही तुमचेच असे सांगत अर्ज दाखल करायला लावून चक्क दुसऱ्या तंबूत जाऊन हे मतदार बसत असल्याने त्या नेत्याला डोक्याला हात लावण्याची वेळ मतदारांनी आणली आहे, त्यामुळे लवकरच “नको रे बाबा निवडणूक’ अशी स्थिती अनेकांची झालेली दिसणार आहे.
रेडा – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील गावागावांत वाडीवस्त्यांवर प्रचाराची राळ उडाली आहे. सातत्याने फसवत आलेल्या नेत्यांची मतदारांकडून “फिरकी’ घेण्यात येत असल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. तर अनेकवेळा कामासाठी नेत्यांच्या मागे धावणारे मतदार ही संज्ञा मोडून मतदारांच्या मागे धावणारे नेते असे चित्र दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांची ताकद मजबुत असल्याने सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. दरम्यान, गरीब सामान्य जनतेला एखाद्या कामासाठी अनेकवेळा हेलपाटे घालायला लावणारे नेते या निवडणुकीत आपले भवितव्य आजमावत आहेत हे पाहून येथील मतदार अनेक पक्षाच्या उमेदवारांना भेटत “मी तुमचाच’ ? “तुमच्यासाठी काय पण’,असा शब्दप्रयोग वापरतात उमेदवारांना बुचकळ्यात पाडत आपलेसे करीत “बसायला गाडी’ अन् “चैन’ करायला इतर गोष्टी घेत उमेदवारांना नकोसे करून सोडले आहे.
गावागावांतील जे नेते गाडी घेऊन भ्रमंती करीत आहेत त्या नेत्यांना मात्र, गावात कुणीही मानायला तयार नाही, असे असतानाही निवडणूक काळात उगीच वादाला तोंड नको म्हणून साध्या गाव नेत्यांही गाड्या भाड्याने दिले आहेत. तर शेगाव पुढारी गाड्या घेऊन फिरत आहेत त्यांना गावातील मतदार राजा विचारतोय गाडी विकत घेतली काय यावर मात्र गाव पुढारी काही बोलताना दिसत नाही त्यामुळे सर्व चेष्टा वातावरण स्पष्ट दिसून येत आहे. जेवणावळ अनेक ठिकाणी होत असल्याने फिरस्ती मतदार घरच्या जेवणाला नापसंती देत बाहेरच्या जेवणावर ताव मारित आहे.