दुबई – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय संघाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.
इंग्लंड 265 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. अमिराती आणि ओमान येथे झालेल्या आयसीसी टी-20 विश्वकरंडक 2021 स्पर्धेत भारताची कामगिरी सुमार झाली होती. भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने टी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत न्यूझीलंड पहिल्या स्थानी आहे, तर कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान मिळवले आहे.