IND vs SA 2nd Test Live Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली आहे तर टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे सुरू झाला, ज्याच्या पहिल्या सत्रात असे काही घडले ज्याची दोन्ही संघांना अपेक्षा नव्हती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला.
Innings Break!
A stupendous outing for our bowlers in the first innings as South Africa are all out for 55 runs in the first session of the 2nd Test.
This is the lowest Test score by an opposition against India.
Scorecard – https://t.co/j9tTnGLuBP #SAvIND pic.twitter.com/86iHajl5Yu
— BCCI (@BCCI) January 3, 2024
दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडेन मार्करम (2 धावा), डीन एल्गर (4 धावा), टोनी डी जॉर्जी (2 धावा), ट्रिस्टन स्टब्स (3 धावा), मार्को यानसेन (0 धावा), केशव महाराज (3 धावा), कगिसो रबाडा (5 धावा), नांद्रे बर्गर (4 धावा) हे स्वस्तात बाद झाले.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 6 विकेट्स घेऊन पहिल्या कसोटीत किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणार्या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.