IND vs ENG 4th Test Day 1 Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आजपासून सुरू झाला आहे. हा सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. हैदराबादमधील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. यानंतर विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये भारतीय संघ विजयी झाला.
Live Score : इंग्लंडला 7वा धक्का…
भारतीय संघाला सातवे यश मिळाले आहे. मोहम्मद सिराजने टॉम हार्टलीला क्लीनबोल्ड करत बाद केले. टॉम हार्टलीने 26 चेंडूत 13 धावा केल्या. आता इंग्लंडची धावसंख्या 7 विकेटवर 256 धावा आहे. इंग्लंडकडून जो रूट 86*(202) आणि ऑली रॉबिन्सन 6*(11) क्रीजवर आहेत.
Wicket No. 2⃣ for Mohd. Siraj! 👍 👍
England 7 down as Tom Hartley departs.
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #TeamIndia | #INDvENG | @mdsirajofficial | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qKzxWAN4mZ
— BCCI (@BCCI) February 23, 2024
इंग्लंडला सहावा धक्का…
इंग्लंडला 225 धावांवर सहावा धक्का बसला. मोहम्मद सिराजने जो रूट आणि बेन फॉक्सची 113 धावांची भागीदारी मोडली. त्याने फॉक्सला जडेजाकरवी झेलबाद केले. फॉक्सचे अर्धशतक हुकले. 126 चेंडूत 47 धावा करून तो बाद झाला.
112 धावांवर इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये….
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आकाशने त्याच्या दुसऱ्याच षटकात जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. मात्र, तो चेंडू नो बॉल ठरला. मात्र, आकाशने हार मानली नाही आणि त्यानंतर त्याने बेन डकेटला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. डकेट 11 धावा करू शकला. यानंतर त्याच षटकात त्याने ऑली पोपला एलबीडब्ल्यू आऊट केले. पोप खातेही उघडू शकला नाही. यानंतर आकाशने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. यानंतर त्याने इंग्लंडच्या डावाच्या 12व्या षटकात जॅक क्रॉलीचा बदला घेतला. त्याने क्रॉलीला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला 57 धावसंख्येवर तिसरा धक्का दिला. दरम्यान, आकाशने त्याच्या 11व्या चेंडूवर क्रॉलीलाही बोल्ड केले होते, पण तो नो बॉल होता.
WPL 2024 : आजपासून रंगणार ‘महिला आयपीएल’चा थरार, ‘या’ दोन संघात होणार सलामीची लढत…
त्यानंतर इंग्लंडला 109 धावांवर चौथा धक्का बसला. अश्विनने सामन्यातील पहिली विकेट घेत जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 35 चेंडूत 38 धावा करून तो बाद झाला. बेअरस्टोने जो रूटसोबत चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. उपाहारापर्यंत इंग्लंडचा निम्मा संघ 112 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. इंग्लंडला 112 धावसंख्येवर पाचवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला 3 धावांवर एलबीडब्लू बाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.