IND vs ENG 5th Test ( Dharamshala ) :- धर्मशाला कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हन घोषित केले आहे. या संघाने प्लेईंग इलेव्हनमध्येही बदल केला आहे. मार्क वुड परत आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना खेळवला जाईल. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने या सामन्यापूर्वी कसून सराव केला आहे.
इंग्लंडने बुधवारी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. संघाने ओली रॉबिन्सनला ब्रेक दिला आहे. त्याच्या जागी मार्क वुड प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. या मालिकेत वुडला आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळता आले आहेत. तो रांची कसोटीचा भाग नव्हता. वुडने भारताविरुद्ध हैदराबाद आणि राजकोटमध्ये सामने खेळले. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने 4 बळी घेतले होते. मात्र, याशिवाय त्याला विकेट घेता आली नाही.
रॉबिन्सनबद्दल बोलायचे झाले तर, भारताविरुद्धच्या या मालिकेत त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. रॉबिन्सन रांची कसोटीत खेळला. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. पण विकेट घेण्यात तो अपयशी ठरला. आता इंग्लंडचा संघ धर्मशाला कसोटीत एक बदलांसह मैदानात उतरणार आहे.
IND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीत भारत विक्रमाच्या उंबरठ्यावर; पाचवी कसोटी जिंकताच…
दरम्यान, कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. यानंतर भारताने सलग तीन सामने जिंकले. टीम इंडियाने दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकली. यानंतर तिसरी कसोटी 434 धावांनी जिंकली. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने चौथी कसोटी 5 गडी राखून जिंकली. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.