World Cup 2023 IND vs BAN Pitch Report :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील प्रचंड भरात असलेला भारतीय संघ पुणे येथे होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सलग चौथा विजय साकार करण्यासाठी सज्ज बनला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीकडे कूच केलेली आहे. पहिल्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवल्यावर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही पराभूत करत भारताने सलग तीन विजयासह सहा गुणांची नोंद करत गुणतालिकेतही पहिला क्रमांक मिळवला आहे.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताचा पुढील सामना म्हणजेच स्पर्धेतील 17 वा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. हा सामना उद्या (19 ऑक्टोबर) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या मैदानावर आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत तर दुसऱ्या डावात खेळणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. या मैदानावरील हा आठवा वनडे सामना असेल.
यंदाच्या विश्वचषकात पावसाने केवळ दोनच सामने विस्कळीत केले आहेत. लखनौ आणि हिमाचल प्रदेशमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये पाऊस पडला होता, तरीही प्रेक्षकांनी या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला. गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पुण्यात दिवसभर ऊन राहील. हवामान अहवालानुसार येथील कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 23 अंश राहण्याचा अंदाज आहे.
पिच रिपोर्ट…
पुण्याची खेळपट्टी फलंदाजांना नेहमीच साथ देते. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. पुण्याच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडतो आणि भरपूर धावा केल्या जातात.
या मैदानावर आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत तर दुसऱ्या डावात खेळणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. मात्र, येथे रात्री गोलंदाजांना अधिक फायदा होतो. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांनाही काही प्रमाणात उपयुक्त ठरते, ज्याचा फायदा भारत आणि बांगलादेशचे फिरकी गोलंदाज घेऊ शकतील.
एमसीएवर पहिल्या डावात सरासरी 307 धावा झाल्या आहेत. त्याचवेळी दुसऱ्या डावातील सरासरी स्कोअर 281 आहे. मैदानात सर्वोच्च धावसंख्या 356 आहे, जी भारताने इंग्लंडविरुद्ध केली होती. नाणेफेक जिंकणारा संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो. या मैदानावरील भारत वि. बांगलादेश हा आठवा वनडे सामना असेल.
दोन्ही संघाचे संभावित Playing 11 खालीलप्रमाणे –
भारत :- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
#CWC23 #INDvBAN : पुण्यातील MCA स्टेडियमवर ‘विराट कोहली’च किंग…
बांगलादेश :- नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, तनजी हसन, महेदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह रियाद, लिटन दास, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद.