मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नुकतंच उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद समोर आला आहे. त्यांच्यातील वादाला आता राजकीय वळण मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलेच ट्विटरवॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्या अटकेची मागणी केली तर दुसरीकडे सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो फेसबूकला शेअर करत चित्रा वाघ यांना खोचक सवाल विचारला होता. दरम्यान, आता सुषमा अंधारे यांनी उर्फीला केलेल्या समर्थनावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत त्यांना खोचक टोला लगावला आहे. त्यासाठी त्यांनी ट्विटरवर काही ट्विटस केले आहेत.
तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ?
व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता,त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं,हा ही धर्म नाही का ?
लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ? ..(2/5)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 3, 2023
“व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच, समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एवढी सदिच्छा आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “स्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का?” असा सवालही विचारला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला आहे. “जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?” असेही म्हटले आहे.
“आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे…तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का?”
तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ?
व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता,त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं,हा ही धर्म नाही का ?
लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ? ..(2/5)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 3, 2023
“लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का? स्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का? माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या. छत्रपतींचा आदर्श,सावित्रीचे संस्कार जपू या… खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या…” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
“हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे,ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे” असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच सामाजिक भान आणि स्वैराचाराला विरोध हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.