Lok Sabha Election 2024 । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाला आहे, मिळलेल्या माहितीनुसार, सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. सुषमा अंधारेंनी सांगितले,’हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते.यादरम्यान ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले.’
मी सुखरुप असून मला कोणतीही इजा झालेली नाही. मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.
हे वाचाल का ? काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा,’गडकरींची जागा धोक्यात, मविआ राज्यात 38 पेक्षा जास्त जागा जिंकणार’