मुंबई – नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक’ असा उल्लेख केल्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे.
यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केल आहे. ते म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण पती पालक होते. म्हणजेच, गो ब्राम्हण पती पालक प्रमाणं ब्राम्हणांचं पालक मान्य आहे; पण कुणबी, शिवा काशिद असेल दलित समाजाचे पालक नव्हते का? असा सवाल भुजबळांनी उपस्थित करुन अजित पवारांच्या संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याबद्दल अभ्यास करून बोलेन, असं स्पष्ट केल आहे. दरम्यान, ‘अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार.. ‘अशा घोषणा देत भाजप कडून आंदोलन केले जात आहे.