जामखेड – शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ‘माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे हे आज विधानसभेत नसले तरी ते भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करतील’ असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रासह देशभराच्या नजरा कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे खिळल्या होत्या. पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे नेते रोहित पवार यांना राष्ट्रवादीतर्फे कर्जत-जामखेडमधून उमेदवारी देण्यात आली होती. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांनी आव्हान उभं केल्यानं येथील निकाल काय लागतो याबाबत सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली होती. मात्र या निवडणुकांमध्ये रोहित पवारांनी बाजी मारत विजयाचा गुलाल उधळला होता.
“माजी जलसंधारण व नगर जिल्हाचे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघात चांगले काम केले तरी त्यांना पराभव स्विकारावा लागला. दुर्दैवाने ते राज्याच्या विधानसभेत नाही. भविष्यात ते राज्याचे नेतृत्व करतील” असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले.