#2020HungarianOpen : शरथ-साथियनला रौप्यपदक

बुडापेस्ट : आयटीटीएफ वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या जी. साथियन आणि आचांता शरथ कमाल या जोडीला पुरूष दुहेरीमध्ये रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत शरथ-साथियन यांचा जर्मनीच्या बेनेडिक्ट डुडा आणि पेट्रिक फ्रान्झिस्का या जोडीने ११-५, ११-९, ८-११, ११-९ असा पराभव केला.

दरम्यान, शरथ-साथियन यांनी उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या किट क्वान हो आणि टिंग चून वाँग या अग्रमानांकित जोडीचा ११-७, १२-१०, ४-११, ४-११, ११-९ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.