पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कात्रज- कोंढवा रस्त्यावरील कान्हा हाॅटेलसमोर ६०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे तातडीचे काम करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी ( दि. ६) करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या दक्षिण भागातील काही उपनगरांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
कोंढवा बुद्रुक, अप्पर इंदिरानगर परिसर -साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, साळवे गार्डन परिसर, श्रेयसनगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, सावकाशनगर, गुलमोहर कॉलनी, अण्णाभाऊ साठेनगर, अप्पर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर इ.
तळजाई झोनमधील परिसर- पुण्याईनगर, बालाजीनगर पार्ट, शंकर महाराज मठ परिसर, अपर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, प्रकल्प सोसायटी, हस्तिनापुरम, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी, स्टेट बँक कॉलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजापार्क, लेकटाउन, चैत्रबन वसाहत, अपर व सुपर इंदिरानगर परिसर, चिंतामणीनगर भाग १ व २.