संगमनेर, (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर परिसरातून गुरुवारी सायंकाळी शहर पोलिसांच्या पथकाने वैदवाडीमधून एका गांजातस्कराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून सुमारे एक किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरात ही कारवाइ करण्यात आली. या भागात खुलेआम गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना समजली होती. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलिसांनी परिसरात धडक दिली असता वैदुवाडीजवळील रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती पैसे घेऊन त्यांना काहीतरी देत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याच्या झडतीत सुमारे 9 हजार रुपयांचा 980 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
याप्रकरणी पोलीस काँन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी प्रशांत पोपट घेगडमल (वय 26, मूळ रा.हिवरगाव पावसा, हल्ली मु.कासारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.