उठसूठ जिल्हा परिषदेत येणे तातडीने बंद करा

शिक्षक, कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी : विनाकारण फिरकण्यास बंदी
पुणे – जिल्हा परिषदांच्या शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेतील कामकाज टाळून विनाकारण जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील शिक्षणाधिकारी कार्यालयात सतत र्फिरताना आढळतात. यामुळे कार्यालयीन कामकाजात व्यत्यय निर्माण होत असल्याचे उघडकीच येऊ लागले आहेत. कामाशिवाय कोणीही कार्यालयात येऊ नये, असा फतवाच शिक्षणाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या योजना राबविण्यात येत असतात. या योजनांच्या प्रमुख बैठका जिल्हा परिषद मुख्यालयात होत असतात. योजनांची माहिती घेणे, बदल्याची प्रकरणे, वेतनाचे विषय, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा करणे यासह इतर विविध कारणांसाठी शिक्षक, कर्मचारी जिल्हा परिषद मुख्यालयात दररोज मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याचे चित्र प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दिसून येते.

लिपिकांच्याभोवती शिक्षक, कर्मचारी जमा होत असल्याने प्रलंबित कामे मार्गी लागण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे आढळून येते. उत्तरे देण्यात, माहिती सांगण्यात बराच वेळ खर्च करावा लागतो आहे. काही जण मध्यस्थांमार्फत कामे मार्गी लावून घेण्याचा प्रयत्नही करत असतात हे तथ्य आहे. यामुळे अधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सक्त आदेशच बजाविले आहेत. मुख्याध्यापकांच्या पूर्व परवानगी शिवाय शिक्षक, कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत येऊ नयेत यादी दक्षता घेण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कार्यालयातील व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही बाह्य व्यक्तीशी कामकाजाबाबत संपर्क साधू नये. कोणाकडून फसवणूक झाल्यास, अनियमितता झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. कामाबाबत संबंधित लिपिकाशी थेट संपर्क न साधता अधिक्षक, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. वेतन पथकाशी निगडीत कामकाजासाठी अधीक्षकांशी संपर्क साधावा.
-डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)