महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी, असभ्य वर्तन

प्रशासनाच्या चुकीनंतरही सोसायटीचे वीजजोड तोडले
सिंहगड रस्ता परिसरात प्रकार वाढल्याने ग्राहक त्रस्त
पुणे – थकीत वीज बिलप्रकरणी घरगुती तसेच सोसायट्यांचे वीजमीटर काढण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचे प्रकार सिंहगड रस्ता परिसरात वाढले आहेत. कारवाईबाबत विचारणा करणाऱ्या महिलांना हे कर्मचारी अरेरावी करत असून पुन्हा नागरिकांना कार्यालयात बोलवून चुकीच्या पद्धतीने वागणूक देत असल्याचेही समोर आले आहे.

आनंदनगर येथील एकता नगरीतील राज अपार्टमेंटच्या कॉमन मीटरला मागील महिन्यात 0 रुपये बिल देण्यात आले होते. त्यानंतर आता अचानक 2 हजार रुपयांचे बिल देण्यात आले असून त्याची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी हे बिल सोसायटीला देण्यात आले. त्यामुळे गडबड लक्षात घेऊन सोसायटीने महावितरणला अर्ज देण्याचे ठरविले असतानाच, शुक्रवारी सकाळी महावितरणचे पथक थकीत कारवाईसाठी सोसायटीत पोहोचले. त्यावेळी या कर्मचाऱ्यांनी गुटखा खाल्लेला होता. तसेच मीटरच्या ठिकाणीच ते थुंकले. त्यावेळी महिलांनी त्यांना “इथे थुंकू नका तसेच चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये, याबाबत आम्ही अर्ज करणार’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर चिडलेल्या या कर्मचाऱ्यांनी महिलांनाही अरेरावीची भाषा केली. त्यामुळे काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सोसायटी पैसे भरण्यास तयार असतानाही “आता कार्यालयात साहेबांना भेटा’ असे सांगण्यात आले. त्यामुळे सोसायटीचे पदाधिकारी कार्यालयात गेले असता, त्यांनाही अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरत सुनावण्यात आल्याचे काही नागरिकांनी “प्रभात’ला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)