IMD Weather : देशात सध्या थंडीचे वातावरण वातावरण आहे. त्यातच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. यासोबतच दाट धुकेही दिसू लागले आहे. त्यातच आज दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थानसह देशातील अनेक राज्ये दाट धुक्याच्या गर्तेत आले आहेत. हवामान खात्याने (IMD) या राज्यांमधील दाट धुक्याची सॅटेलाईट इमेज देखील शेअर केली आहेत, ज्यामध्ये या राज्यांवर पिवळ्या वर्तुळात धुक्याचा पांढरा थर दिसत आहे.
नवीन वर्षात या राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने शेअर केलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होत आहे. हवामान खात्यानुसार, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये 28 डिसेंबरपर्यंत दाट धुके दिसून येईल. राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य झाली आहे. प्रदूषणाबरोबरच दाट धुके हे त्याचे कारण आहे. दिल्लीशिवाय राजस्थान, यूपी, हरियाणा आणि पंजाबमधील अनेक भागात हीच परिस्थिती आहे. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी दाट धुके आणि तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
Attached RAPID INSAT 3DR satellite imagery shows fog layer spreading over Punjab, Haryana, Delhi, Uttar Pradesh and North Madhya Pradesh visible in the yellow-circled area: IMD pic.twitter.com/booEC6yrmQ
— ANI (@ANI) December 26, 2023
आयएमडीनुसार, येत्या दोन दिवसांत धुके आणखी वाढेल. 28 डिसेंबरपर्यंत दिल्लीत मध्यम ते दाट धुके दिसून येईल, तर पंजाब आणि हरियाणामध्ये थंड लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. इथे थंड वारे वाहतील जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असणार आहेत. त्यामुळे लोकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
मंगळवारी, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये दाट ते दाट धुके होते. उत्तराखंडमध्येही अशीच परिस्थिती आहे. IMD ने पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवार आणि शनिवारी आणि आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मंगळवार ते शनिवारपर्यंत दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
आपल्या ताज्या अहवालात, IMD ने वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे दक्षिण आणि मध्य भारतातील काही राज्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो. “30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान वायव्य आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता आहे,” असे त्यात म्हटले आहे. IE नुसार, पुढील पाच दिवसांत केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.