Gold-Silver Price Today : सोने-चांदीने पुन्हा जोरदार मुसंडी मारली. या आठवड्यात मौल्यवान धातूंनी आघाडी घेतल्याने किंमतींनी आस्मान गाठले आहे. त्यामुळे ग्राहकांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. आज सोन १० ग्रॅम २४ कॅरेटवर ६३,२९० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,१२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
रिपोर्ट्सनुसार, चांदी ७५,६४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
मुंबई
– २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,९१५ रुपये आहे.
– २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,१८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
– प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९१५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,१८० रुपये असेल.
नागपूर
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९१५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,१८० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,९१५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,१८० रुपये आहे.