“मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्हीही वाचणार नाही”

रावसाहेब दानवेंना जावायाची धमकी

मुंबई : भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जावई हर्षवर्धन जाधव यांनी सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्हीही जगा… पुन्हा जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेल आणि तुम्हाला अडछणीत आणीन अशी धमकी माजी आमदार आणि रावसाबेर दानवेचे जावाई हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून दानवेंना धमकी दिली आहे. या व्हिडिओत हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवून दानवेमुळेच माजी ही अवस्था झाल्याचा आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात हर्षवर्धन जाधव यांनी राजकरणातून सन्यास घेतल्यानंतर ते राज्यात चर्चेचा विषय होते. त्यानंतर आठवडाभरात यूट्युबवर व्हिडिओ अपलोड केला असून सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जावाई आणि सासऱ्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत.

या व्हिडिओत हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणालेत की, ‘तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि अनेक वरिष्ठ वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, इतकं लक्षात ठेवा’, असा धमकीवजा इशाराच दानवे यांनी जाधव यांनी दिला असून या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.