Jalna Lok Sabha Election| काँग्रेसने राज्यातील उमेदवारांची चौथी यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली आहे. जालना लोकसभा निवडणुकीची जागा परंपरेनुसार काँग्रेस पक्षाला सुटली आहे. त्यानुसार काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर या यादीत धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे कल्याण काळे आता भाजपच्या रावसाहेब दानवेंशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये २००९ मध्ये थेट लढत झाली होती. तेव्हा रावसाहेब दानवे यांना ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली होती तर कल्याण काळे यांना ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. त्यात दानवेंचा अवघ्या साडे आठ हजार मतांनी विजय झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ सालीही रावसाहेब दानवे जालन्यातून निवडून आले.
दानवे विरुद्ध काळे लढत Jalna Lok Sabha Election|
जालना लोकसभा मतदार संघामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, पैठण हे विधानसभा मतदारसंघ येतात. जालना हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले आहेत. आता सहाव्यांदा ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. यातच आता पुन्हा एकदा जालन्यात दानवे विरुद्ध काळे लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:
मराठवाडा, विदर्भात अवकाळीसह गारपीटीची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी?