मुंबई : सद्याच्या राजकीय परिस्थितीवरून शिवसेना भवनात शिवसेनेचे नेते, पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांना घेऊन ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असा नवा गट स्थापन केल्याचे कळते आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हंटले की , बाळासाहेब ठाकरेंचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही , हिम्मत असेल तर स्वात:च्या बापाच्या नावाने मतं मागा ” असा हल्लाबोल केला आहे.
आगामी पालिका निवडणुकीत भगवा फडकणार
या बैठकीत एकूण सहा ठराव मंजूर झाल्याचे समजते आहे. संजय राऊत यांनी या बैठकीत सांगितले की सेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार केवळ उद्धव ठाकरे यांना राहतील . आगामी पालिका निवडणुकीत भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
–शिवसैनिकांचे माझ्यावर जास्त प्रेम आहे कारण मी बाळासाहेबांचा मुलगा आहे
–बंडखोरांना त्यांचा निर्णय घेऊ द्या
–सेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार केवळ उद्धव ठाकरे यांना राहतील : संजय राऊत
–आगामी पालिका निवडणुकीत भगवा फडकणार
–पहिले नाथ होते आता दास झाले : उद्धव यांचा शिंदेंना टोला
–बाळासाहेब ठाकरेंचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही , हिम्मत असेल तर स्वात:च्या बापाच्या नावाने मतं मागा