मुंबई : राज्यात जी काही परिस्थिती झाली आहे. त्याला भाजप कारणीभूत असल्याची भूमिका सुरवातीपासूनच उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आज शिवसेना कार्यकारिणीची बैठक झाली . यामध्ये बोलताना त्यांनी शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा हल्लाबोल केला आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना नोटिस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय एकनाथ शिंदेंचे नेतेपद काढा अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केल्याचे समजते आहे.
हिम्मत असेल तर स्वात:च्या बापाच्या नावाने मतं मागा
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांना घेऊन ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असा नवा गट स्थापन केल्याचे कळते आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हंटले की , बाळासाहेब ठाकरेंचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही , हिम्मत असेल तर स्वात:च्या बापाच्या नावाने मतं मागा ” असा हल्लाबोल केला आहे.
आगामी पालिका निवडणुकीत भगवा फडकणार
या बैठकीत एकूण सहा ठराव मंजूर झाल्याचे समजते आहे. संजय राऊत यांनी या बैठकीत सांगितले की सेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार केवळ उद्धव ठाकरे यांना राहतील . आगामी पालिका निवडणुकीत भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीतील महत्वाचे मुद्दे :
–शिवसैनिकांचे माझ्यावर जास्त प्रेम आहे कारण मी बाळासाहेबांचा मुलगा आहे
–बंडखोरांना त्यांचा निर्णय घेऊ द्या
–सेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार केवळ उद्धव ठाकरे यांना राहतील : संजय राऊत
–आगामी पालिका निवडणुकीत भगवा फडकणार
–पहिले नाथ होते आता दास झाले : उद्धव यांचा शिंदेंना टोला
–बाळासाहेब ठाकरेंचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही , हिम्मत असेल तर स्वात:च्या बापाच्या नावाने मतं मागा