नागपूर : आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी असाच कडक आदेश देत सर्व कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे. आपलं काम जमत नसेल तर घरी जा असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉक्टरांना दिला. करोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुढें यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची शाळा घेतली. नागपूर महानगरपालिकेची अवस्था पाहून त्यांना संताप आल्याने त्यांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली.
Please stay home . You can get services of grocery, vegetables, milk medicine,etc by calling vendors, whose list is shared . We are out on the roads for you . Stay Home, Stay safe, stay Healthy. https://t.co/lBNoGdnWWR
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) March 28, 2020
नागपूर महानगरपालिकेचे सर्वात चांगले असणारे रूग्णालय आज उकिरड्यासारखे झाले आहे. असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत मुढे यांनी सर्वांना सक्त ताकीद दिली. महानगपालिकेचे डॉक्टर्स योग्यरित्या आपली प्रॅक्टिस करत नाही. ज्यांना काम जमत नसेल त्यांनी घरी जावे, असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, करोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडत असल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
यापूर्वीही काही दिवसांपूर्वी तुकाराम मुढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. या ठिकाणी करोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाउनचे पालन योग्यरित्या होत नसल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचे पालन न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. असा इशाराही त्यांनी दिला होता. याव्यतिरिक्त लॉकडाउन दरम्यान जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी पालिकेने सुविधाही सुरू केली आहे.