Bharti Singh In Hospital| टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कॉमेडियन अभिनेत्री म्हणजे भारती सिंग. आपल्या विनोदी शैलीने ती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. मात्र नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहत्यांना हैराण केले आहे. दरम्यान, भारती सिंगला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं तिला काय झाले आहे याची माहिती तिने व्हिडिओद्वारे सांगितली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून भारतीच्या पोटात दुखत होते. सुरुवातीला गॅस्ट्रोचा त्रास होत असल्याचे समजून भारतीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीने व्हिडीओमध्ये चाहत्यांना ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. तसेच व्हिडीओमध्ये भारतीने तिच्या लहान मुलाला सोडून राहवं लागत असल्याने दु:ख व्यक्त केले. Bharti Singh In Hospital|
दरम्यान, भारतीने 2017 मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले होते. तिने 2022 मध्ये एका मुलाला जन्म दिला. जवळपास 7 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून निवडले होते. हर्षने पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकसाठी संवाद लिहिले होते. याशिवाय ‘मलंग’ चित्रपटाचा टायटल ट्रॅकही त्यांनी लिहिला होता. Bharti Singh In Hospital|
भारती सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नृत्य आणि गाण्याचे रिॲलिटी शो होस्ट करण्यासोबतच ती YouTube वर मजेदार व्लॉग शेअर करत असते. तिने कपिल शर्मा शोमध्येही काम केले आहे.
हेही वाचा:
स्पृहा जोशी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यासोबत झळकली; शेअर केली खास पोस्ट