सातारा (प्रतिनिधी) – येथील श्री मंगलमुर्ती हॉस्पिटलच्या वतीने १ मे रोजी कामगार दिनानिमित्त बोरगाव पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन श्री मंगलमुर्ती हॉस्पिटलचे चेअरमन सयाजी चव्हाण, अजिंक्यतारा सूतगिरणीचे संचालक अजित साळुंखे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, साक्षी उद्योग समूहाचे प्रमुख नितीन साळुंखे, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. जयदीप चव्हाण, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ भूषण पाटील, डॉ. नितीन लेंभे , पोटविकार तज्ञ डॉ. संदीप निकम तसेच डॉ. अजिंक्य दिवेकर, डॉ ओमकार सांगळे उपस्थित होते.
रवींद्र तेलतुंबडे म्हणाले, पोलिसांचे जीवन कायमच तणावाखाली असते. इमर्जन्सी ड्युटी, अपुरी झोप, वेळी-अवेळी जेवण, ताण-तणाव या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. यामुळे अगदी लहान वयातही बऱ्याच कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मंगलमुर्ती हॉस्पिटलने आरोग्य शिबिर घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तसेच शक्य तेवढ्या गोष्टींचे वेळेत पालन करण्याचे सांगितले.
त्यामुळे तरी कर्मचारी आरोग्य विषयक जागरूक होतील व आपले काम व आरोग्य यांची योग्य ती सांगड घालतील. मंगलमुर्ती हॉस्पिटलचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. सयाजी चव्हाण यांनी बोरगाव ग्रामस्थ व पोलीस कर्मचाऱ्यांना श्री मंगलमुर्ती हॉस्पिटल हे किमान वर्षातून एकदा असे आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर आयोजित करेल असे आश्वासन दिले. डॉ. जयदीप चव्हाण यांनी आभार मानले.