मिशा पिळण्यातून वेळ मिळाला तर विकास दिसेल

कराड येथील पत्रकार परिषदेत उदयनराजेंचे प्रतिपादन

कराड – खासदार म्हणून काम करत असताना जिल्ह्यामध्ये 18 हजार कोटींची कामे केली आहेत. तरीही विकास काय केला, असे मिशांना पिळ देऊन विचारणाऱ्यांना तो दिसत नाही. विरोधकांना मिशा पिळण्यातून वेळ मिळाला तर विकास दिसेल ना?, असा टोला खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लगावला. वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचे वेळीच थांबवावे, अन्यथा मी शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार भोसले म्हणाले, जिल्ह्यामध्ये खासदार निधीतून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. अपुऱ्या माहितीवर विरोधक खासदारनिधी परत गेला आहे, अशा वल्गना करत आहेत. खोट बोलणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे.तुम्ही जर वैयकित्क पातळीवर टीका करणार असला तर मी ही गप्प बसणार नाही. माथाडी कामगारांची पिळवणूक करून तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचला आहात, हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करायला मागे पुढे पाहणार नाही.

खासदार भोसले म्हणाले, रस्ते विकासासाठी, जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण मार्ग व मजबुतीकरणासाठी, इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी, लहान बंधार्यांसाठी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा वेगवेगळ्या स्तरातून निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील विकास कसा करावा याचा आराखडा असणारा जाहीरनामा आम्ही तयार केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी सातारा येथे या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा जाहीरनामा जनतेचा सर्वांगीण विकास साधणारा असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.