पुन्हा हल्ले करण्याचे तालिबानचे सूतोवाच

काबुल – अफगाणिस्तानमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या हिंसाचाराला समाप्त करण्यासाठी आणि अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्यासंदर्भात तालिबान आणि अमेरिकेमध्ये शांतता चर्चा सुरू आहेत. मात्र तरिही तालिबानने अज पुन्हा एकदा आक्रमक धोरण स्वीकारल्याचे जाहीर केले. तालिबानने इंग्रजीसह एकूण 5 भाषांमध्ये आपले धोरण स्पष्ट केले. अमेरिकेत विदेशी फौजा राहू नयेत यासाठी पुन्हा एकदा हल्ले सुरू करण्यात येतील, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. जिहादी हल्ल्यांना अधिक तीव्र करण्याची सूचना तालिबानने मुजाहिदीनांना केली आहे.

तालिबानकडून दरवर्षी अशाप्रकारे आक्रमक धोरण स्पष्ट केले जात असते. अफगाणिस्तानमधील कडाक्‍याच्या थंडीच्या काळातही दहशतवाद्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण कमी केले जात नाही. अफगाणिस्तानी सुरक्षा दले आणि नाटो सैन्यावर जवळपास दररोज तालिबान्यांकडून हल्ले केले जात असतात. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचाही बळी जातो. अलिकडे सोमवारी अमेरिकेच्या हवाई तळावरच्या हल्ल्यामध्ये तीन खलाशी ठार झाले होते.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या 17 वर्षांपासून अमेरिकेचे सैन्य आहे, तरी सध्या देशाच्या निम्म्या भागावर तालिबानचा ताबा आहे.

गेल्या वर्षभरापासून अमेरिका आणि तालिबानदरम्यान शांतता चर्चा सुरू आहे. तालिबानच्या घोषणेमुळे या शांतता चर्चेची प्रक्रिया रखडणार असल्याची टीका सरकारकडून करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.