मुंबई :- भारताचा स्टार क्रिकेटपटू व यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यंदा भारतातच होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत समालोचन करणार आहे.
यंदाच्या वर्षी आयपीएल स्पर्धेत एक खेळाडू म्हणून खेळल्यावर त्याने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतही आपल्याला संधी मिळेल असे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर त्याने नवोदितांना जास्त संधी मिळाली पाहिजे, असेही मत व्यक्त केले होते.
आता तो पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत या स्पर्धेत दिसणार आहे. कार्तिकने यापूर्वीही अनेक सामन्यांचे तसेच स्पर्धांचे समालोचन केले आहे. आयपीएल स्पर्धेत खेळत असतानाच तो या क्षेत्राकडे वळला होता व त्याला आता विश्वकरंडक स्पर्धेतही समालोचनाची संधी मिळत आहे.