IPL 2024 : सामन्यादरम्यानचे रोहितचे ‘ते’ शब्द स्टंप माइकमध्ये झाले रेकॉर्ड, टी-20 विश्वचषकात ईशान-सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळणार संधी?

IPL 2024, Rohit Sharma Sledging Dinesh Karthik : आयपीएल 2024 मध्ये दिनेश कार्तिक उत्कृष्ट फॉर्म दाखवत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या यष्टिरक्षक फलंदाजाने 23 चेंडूत 53* धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. कार्तिकची चमकदार फलंदाजी पाहून मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने त्याला जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक 2024 साठी गंमतीशीररित्या स्लेजिंग(डिवचलं) केले आहे.
हा स्लेडिंगचा गमंतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 38 वर्षीय दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. या खेळीदरम्यान त्याने आकाश मढवालच्या एका षटकात थर्ड मॅनच्या दिशेने चार चौकार खेचले.
@DineshKarthik Well played anna.. Did Rohit’s sledging helped you in this performance😅 #RohitSharma #ViratKohli #DineshKarthik #MI pic.twitter.com/HfJARYiSb6
— G.V.Sudarshan Reddy (@gvsreddy93) April 12, 2024
त्यानंतर स्लीपमध्ये उभा असलेला रोहित शर्मा कार्तिकच्या खेळीने प्रभावित होऊन त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, “ टी-20 वर्ल्ड कप सिलेक्शनसाठी पुश करायचंय याला. शाब्बास डीके, वर्ल्ड कप खेळायचाय अजून, डोक्यात वर्ल्डकप सुरु आहे, वर्ल्डकप.” त्याने DK उर्फ दिनेश कार्तिकची फिरकी घेतली आणि त्याची ही गंमत स्टम्प माईकमध्ये कैद झाली.
@DineshKarthik Well played anna.. Did Rohit’s sledging helped you in this performance😅 #RohitSharma #ViratKohli #DineshKarthik #MI pic.twitter.com/HfJARYiSb6
— G.V.Sudarshan Reddy (@gvsreddy93) April 12, 2024
रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी आपआपल्या पद्धतीने या व्हिडीओवर कमेंट्स देत आहेत. काहीनी रोहितचे हे स्लेजिंग गंमतीशीररित्या घेतलं आहे तर काहींनी अनेक तर्क लगवाले आहेत. काही वाटतं की, रोहित वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे त्याने DK ला वर्ल्ड कपसाठी तयार राहायला सांगितले आहे. दरम्यान, रोहितने इतर यष्टीरक्षक फलंदाजांना इशारा दिलाय की तो मस्करी करतोय, हे लवकरच समजेल. पण यामुळे रिषभ पंत,इशान किशन, के एल राहुल तसेच संजू सॅमसन यांचे टेंशन नक्कीच वाढले असणार.
याआधीही दिनेश कार्तिकसोबत असे घडले आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर दिनेश कार्तिकची 2022 च्या टी-20 विश्वचषकात निवड झाली होती. आता 2024 च्या T20 विश्वचषकासाठीही दिनेश कार्तिक निवडकर्त्यांना प्रभावित करू शकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यावेळी टी-20 विश्वचषकासाठी अनेक यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये स्पर्धा असणार आहे. निवडकर्ते कोणत्या यष्टिरक्षकाला संधी देतात हे पाहणे बाकी आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. यासाठी संघाची निवड 30 एप्रिल किंवा 1 मेला होणार आहे. दरम्यान, दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गेल्या 6 सामन्यात 5 डावात 71.50 च्या सरासरीने 143 धावा केल्या आहेत. यात त्याने 190.66 च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या आहेत.





