IPL 2024 , CSK vs RCB Live Cricket Score : आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना खेळला जात आहे. RCB ने CSK विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
अनुज रावत आणि दिनेश कार्तिक हे आरसीबीसाठी संकटमोचक ठरले आहेत. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 57 चेंडूत 95 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 20 षटकात 6 बाद 173 धावांपर्यत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 174 धावा कराव्या लागतील.
Innings Break!
Anuj Rawat & Dinesh Karthik fire with the bat to power @RCBTweets to 173/6 🙌 🙌
Mustafizur Rahman stars with the ball for @ChennaiIPL 👌 👌
Stay Tuned for the #CSK chase ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/4j6FaLF15Y#TATAIPL | #CSKvRCB pic.twitter.com/OgVMjbwQiX
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
बंगळुरू संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र डु प्लेसिस बाद होताच संघ संघर्ष करताना दिसला. कोहली कठीण परिस्थितीत संघाला सांभाळण्यासाठी ओळखला जातो, मात्र तोही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकला नाही. 78 धावांवर संघाच्या पाच विकेट पडल्या होत्या. 12व्या षटकात मुस्तफिझूर रहमानने प्रथम विराट कोहली (21) आणि नंतर कॅमेरून ग्रीनला बाद केले. आरसीबीची फलंदाजी ढासळली होती, पण सहा आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनुज आणि कार्तिकने दमदार कामगिरी करत सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. डू प्लेसिसने 23 चेंडूत 8 चौकारांसह 35 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. रजत पाटीदारचा खराब फॉर्म सुरूच आहे, जो केवळ 3 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला आणि ग्लेन मॅक्सवेलही पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. कॅमेरून ग्रीन अतिशय संथपणे खेळताना दिसला, त्याने 22 चेंडूत केवळ 18 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान याने 4 षटकात केवळ 30 धावा देत 4 बळी घेतले. तर दीपक चहरने एक गडी बाद केला.
अव्वल फळी आणि मधली फळी कोसळल्यानंतर दिनेश कार्तिक आणि युवा खेळाडू अनुज रावत यांनी जबाबदारी स्वीकारली. अनुज रावतने 25 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर CSKचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक धोनीने त्याला धावबाद केले. तर त्याच वेळी, दिनेश कार्तिकने 26 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा काढल्या.
तुषार देशपांडे महागडा गोलंदाज ठरला कारण त्याने डावाच्या 18व्या षटकात 25 धावा दिल्या. रहमानने सीएसकेला चांगली सुरूवात दिली होती. मात्र शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यात संघ पूर्णपणे अपयशी ठरला. चेन्नई बेंगळुरूला 150 पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत रोखेल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. आरसीबीने 20 षटकात 173 धावा केल्या आहेत.