पुणे – गेल्या काही दिवसांपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) चांगलेच चर्चेत आहेत. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्याशी भुजबळांचा सुरु असलेला संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. सर्व राजकारणी ओबीसी आरक्षणावरून (Reservation Issue) शांत असताना भुजबळांना ओबीसींची बाजू मांडायला सुरुवात केली. अशात आता वंचितचे (VBA) नेते प्रकाश आंबडेकर यांनी छगन भुजबळ हे माझ्यामुळेच तुरुंगातून बाहेर आल्याचा दावा केला आहे.
नुकतंच माझी प्रकाश आंबेडकरांबद्दल (Prakash Ambedkar) नाराजी नाही.असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिल होत. त्यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”माझीही त्यांच्याबद्दल नाराजी नाही. उलट त्यांना तुरुंगातून बाहेर काढणारा मीच आहे.” महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या फुले वाड्यात जाऊन प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी भुजबळांबाबत भाष्य केलं. (Prakash Ambedkar on Chhagan Bhujbal)
ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”छगन भुजबळांची भूमिका मंडल आयोगाच्या विरोधात होती. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आधी इतिहास शोधा आणि तो लोकांसमोर आणा असं देखील ते यावेळी म्हणाले.
आंबेडकर पुढे म्हणाले,”माझी भुजबळांबद्दल नाराजी नाही. उलट त्यांना तुरुंगातून बाहेर काढणारा मीच आहे. मी त्या न्यायाधीशाला शिव्या घातल्या नसत्या तर आज भुजबळ तुरुंगातून बाहेर आले नसते. माझी भुजबळांवर नाराजी असती तर मी सार्वजनिकरित्या त्या न्यायाधीशाला शिव्या घातल्या नसत्या.न्यायपालिका त्यांचा जामीन नाकारत होती. त्यावेळी मीच उलटा वार केला होता. न्यायपालिका जर व्यवस्थित वागली नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भुजबळांबद्दलचा निर्णय घेतला नाही तर संबंधित न्यायाधीशावर खटला चालवता येऊ शकतो, असं मीच बजावलं होतं. त्याच्या पुढच्या दिवशी भुजबळांना सोडून देण्यात आलं” असं स्पष्ट मत आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केलं.