India vs Australia 3rd T20 2023, Guwahati Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज (मंगळवारी, 28 नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. दोन सामने जिंकून टीम इंडिया मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी घेण्यावर त्याची नजर असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून त्यांची नजर कांगारूंना पुन्हा एकदा पराभूत करण्यावर आहे.
Accuweather (weather forecast app) नुसार, आज (28 नोव्हेंबर रोजी) गुवाहाटीमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. आकाश ढगांनी झाकले जाण्याची(ढगाळ वातावरम) शक्यता नाही. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता खेळ सुरू होईल. त्यावेळी कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे, तर खेळ संपल्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 च्या सुमारास तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना आणखी एक रोमांचक सामना पाहता येणार आहे.
फलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल …
गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत या सामन्यातही धावांचा पाऊस पडू शकतो. या मैदानावर अनेक चौकार आणि षटकार मारले जातात. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या T20 मध्ये येथे 400 हून अधिक धावा झाल्या. चाहत्यांना आणखी एक स्फोटक सामना पाहायला मिळू शकतो.
गुवाहाटीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड…
भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाला सहा वर्षांनंतर बदला घ्यायला आवडेल. तर 2022 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 धावांनी विजय मिळवला होता.
IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियासाठी आज ‘करो या मरो’चा सामना! जाणून घ्या..Match बाबत खास गोष्टी
2020 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एक सामना खेळवला जाणार होता, परंतु नाणेफेक झाल्यानंतर पावसामुळे सामना होऊ शकला नाही.