काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत.
#WATCH | “I don’t trust anybody, including you, I love you but there is not a lot of people I trust. Taliban has to make a fundamental decision,” says US President Joe Biden on being asked –do you trust them (Taliban) now? pic.twitter.com/LDREjZm5Yn
— ANI (@ANI) August 23, 2021
या धुमश्चक्रीवेळी जागतिक स्तरावरून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र अगदी गल्लीपासून अमेरिकेपर्यंत अनेकविध देश आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे तालिबानसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बायडेन यांनी तालिबानवर विश्वास आहे की नाही याबद्दलही उत्तर दिल आहे.
पत्रकरांनी बायडेन यांना तालिबान संदर्भात प्रश्न विचारला की,’तुम्हाला तालिबानवर विश्वास आहे का ? ‘ या प्रश्नांवर बायडेन म्हणाले,’मी कुणावरच विश्वास ठेवत नाही. माझ तुमच्यावर प्रेम आहे मात्र मी कुणावरही विश्वास ठेवत नाही. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपले मत मांडले आहे.
ते पुढे म्हणाले,’आता पर्यंत तालिबानींनी कुठल्या प्रक्रारे अमेरिकी सैनिकांवर हल्ला केला नाही. तसेच तालिबान्यांनी आता पर्यंत जे काही विधानाने केलेले आहे ते त्याप्रमाणे वागणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. येत्या काळात इतर देशांकडून त्यांना मान्यता मिळते की नाही याकडेही त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.’ असंही ते म्हणाले.