Karnataka । कर्नाटकातील जेडीएस नेते प्रज्वल रेवन्ना यांच्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीचे पथक त्याचे वडील एचडी रेवन्ना यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. प्रज्वल रेवन्नाचे वडील एचडी रेवन्ना यांच्यावरही लैंगिक छळ आणि अपहरणाचा आरोप आहे.
एसआयटीचे पथक पीडित महिलेला घेऊन हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील रेवन्नाच्या घरी पोहोचले. एसआयटीसह डीवायएसपी, दोन निरीक्षक आणि एक पोलीस हवालदार यांच्यासह तपास पथक पीडित महिला आणि स्थानिक पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आहे. पंचनामा केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पीडितेचा जबाब नोंदवतील. रेवन्नाची पत्नी भवानी यांच्यासह रेवन्नाचे वकील आणि जेडीएसचे काही नेते तिथे उपस्थित होते. तत्पूर्वी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रज्वल रेवन्ना प्रकरणावर उच्च पोलीस अधिकारी आणि एसआयटी टीमची तातडीची बैठक घेतली होती.
Karnataka । 700 महिलांनी महिला आयोगाला लिहिले पत्र
महिला हक्क गटातील 700 हून अधिक महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून प्रज्वल आणि एचडी रेवन्ना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मोहीम गुगल फॉर्मच्या माध्यमातून चालवण्यात आली. पत्र लिहिणाऱ्या महिलांनी या प्रकरणी एनसीडब्ल्यूच्या कमकुवत प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑल इंडिया फेमिनिस्ट अलायन्स, वुमन फॉर डेमोक्रसी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या इतर संघटनांच्या सदस्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
#WATCH | Hassan, Karnataka | SIT officials reach the residence of JD(S) leaders HD Revanna and Prajwal Revanna in Holenarasipura, in connection with ‘obscene’ videos case
A case of kidnapping was booked against HD Revanna in Mysuru yesterday. pic.twitter.com/dRKF8IxRAN
— ANI (@ANI) May 4, 2024
या पत्रावर 700 महिलांच्या सह्या आहेत. त्यांनी एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे आणि डिसेंबर 2023 पासून प्रज्वल रेवन्ना यांच्या गुन्हेगारी कारवायांबाबत सत्ताधारी पक्षाकडे उपलब्ध असलेल्या माहितीची चौकशी करण्यासाठी भाजप अध्यक्षांना समन्स जारी करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान बेपत्ता झालेली महिला यापूर्वी एचडी रेवन्ना यांच्या घरी काम करत होती. महिलेच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतीश बाबू नावाच्या व्यक्तीला यापूर्वीच अटक केली आहे. पोलीस एचडी रेवण्णाचाही शोध घेत आहेत. म्हैसूर अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला रेवन्नाच्या जवळचा सहकारी सतीश याचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे.
सतीशचा मोबाईल एफएसएल टीमकडे पाठवण्यात आला. सतीशने अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस सतीशचा ठावठिकाणा आणि त्याच्या मोबाईल नेटवर्कद्वारे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने या प्रकरणी एसआयटीसाठी अतिरिक्त सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
हे वाचले का ? ‘कुटुंब संभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय संभाळणार?’ पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांच सडेतोड प्रत्युत्तर