Rohit Pawar On Onion Export| लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून कांद्याचा प्रश्न चर्चेत होता. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आणि कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता.
कांद्याचे दर आटोक्यात राहावेत यासाठी मोदी सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली होती. मात्र, यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये त्याविषयी नाराजी होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील महायुतीचे नेते प्रयत्न करत होते. आता या संदर्भात केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. यावर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, “मोदी साहेबांनी केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे गेली पाच महिने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन अक्षरशः मातीमोल भावात कांदा विकला गेला. आता निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून कुठेतरी मलमपट्टी करण्याचा मोदी साहेब प्रयत्न करत आहेत.” Rohit Pawar On Onion Export|
मोदी साहेबांनी केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे गेली पाच महिने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन अक्षरशः मातीमोल भावात कांदा विकला गेला. आता निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून कुठेतरी मलमपट्टी करण्याचा मोदी साहेब प्रयत्न करत आहेत.
आज सकाळी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा… pic.twitter.com/5qlWl3qX0G
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 4, 2024
MEP ची अट का टाकली? Rohit Pawar On Onion Export|
पुढे त्यांंनी लिहीले की, “आज सकाळी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला तर त्यात देखील ५५० $ / टन किमान निर्यात मूल्य (MEP) ची अट टाकून निर्यात होऊ नये याचीच काळजी मोदी साहेबांनी घेतली आहे. MEP ची अट का टाकली? यावर मोदी साहेब आणि अमित शहा साहेब बोलणार नाहीत, त्यामुळे शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा आणि भारती पवार मॅडम यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे,”असे म्हंटले आहे.
यावेळी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशा णा साधला. नव्या सर्कुलरमध्ये कालपर्यंत निर्यातबंदी लागू असल्याचे स्पष्ट आहे. याचाच अर्थ गेल्या आठवड्यात निर्यात बंदी उठवल्याच्या चुकीच्या बातम्या पेरून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्र सरकारचा उदो उदो करून घेत शेतकऱ्यांची फसवणूक केली, हे मात्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हंटले आहे. Rohit Pawar On Onion Export|
हेही वाचा: