प्रभात वृत्तसेवा
पुणे – रेल्वेच्या पुणे येथील रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लॅंट उभारण्यात आला आहे. यामुळे हे रुग्णालय ऑक्सिजन निर्मितीत “आत्मनिर्भर’ होणार आहे.
रेल्वे रुग्णालयात प्रामुख्याने रेल्वेचे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांवर उपचार करण्यात येतात. रेल्वे रुग्णालयाला करोनासह अन्य रुग्णांसाठी दररोज 30 ते 35 जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासणार आहे.
या दरम्यानच्या वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे रुग्णालयात नवीन ऑक्सिजन प्लॅट उभारण्याचे काम मागील काही महिन्यांपासून हाती घेतले होते.
यावेळी पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ. संजय आठवले, अपर मंडल रेल्वे प्रबंधक नीलम चंद्रा, प्रकाश उपाध्याय, डॉ. अविनाश निकाळजे, डॉ. अभय कुमार मिश्रा आदींसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या प्लांटमध्ये “प्रेशर स्विंग एडसोर्पशन’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.