बॉलीवूडमधील ऍक्शन हिरो ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा गतवर्षी गांधी जयंतीला “वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमाविला होता. यानंतर पुन्हा एकदा ही जोडी ऍक्शन चित्रपट साकारत आहे.
चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाले, मला दोन स्टार मिळाले आहेत आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर एक बेंचमार्क स्थापित करण्यासाठी प्रेरित केले आहे. “वॉर’ चित्रपट एका थ्रिलरसारखा होता. हा चित्रपट ऐवढे यश मिळविले असे मला वाटले नव्हते. जेव्हा चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले. तेव्हा त्यात ऋतिक आणि टायगर होता. ते आमच्यासाठी एक ड्रीम कास्ट होते. तसेच दोन सुपरस्टार एकत्रित येणे खूपच रोमांचक होते.
आजकाल एका चित्रपटात दोन सुपरस्टार कलाकारांना घेणे हे दिव्यस्वप्न असल्यासारखे होते. दरम्यान, ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांना पुन्हा एकत्रित घेवून ऍक्शन चित्रपट साकारण्यात येणार आहे. यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा या जोडीमधील ऍक्शन वॉर पाहण्यास मिळणार आहे. या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.