यशराज फिल्म्सला नुकतेच 50 वर्षे पूर्ण झाले आहेत. या खास प्रसंगी कंपनीचे मालक आदित्य चोप्रा याने एक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू केले आहे. यातच आदित्य आपले वडील यश चोप्रा यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक चित्रपट साकारण्याच्या तयारीत आहे. यात सुपरस्टार शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समजते. यशराज फिल्म्सला 5 दशक पूर्ण झाल्याच्या प्रसंगी आदित्य चोप्राने आपल्या वडिलांचे आभार मानले.
ट्विटरद्वारे त्याने आपल्या भावना शेअर केल्या. मनोरंजनाचे 50 वर्षे, तुमच्या सर्वांचे मनोरंजन करण्याचे 50 वर्षे. यश चोप्रा यांना व्यवसाय कसा करायचा हे माहीत नव्हते. पण कठोर परिश्रम आणि प्रतिभा यावर त्यांचा विश्वास होता. त्यांचा आत्मनिर्भरतावर विश्वास होता. जेव्हा एका सृजनशील व्यक्तीने (यश चोप्रा) आपल्या कलेवर विश्वास ठेवला, तेव्हा यशराज फिल्मचा जन्म झाला. आदित्य म्हणाला, व्ही. शांताराम यांनी आपल्या स्टुडियोतील एक छोटीशी खोली यश चोप्रा यांना दिली होती.
या खोलीतून त्यांनी या कंपनीची सुरुवात केली होती, जी आज चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 1995मध्ये 25व्या वर्षपूर्तीला मी डेब्यू केले होते आणि “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात मिळविलेल्या यशाने मला प्रेरित केले, असे सांगत अनेक आठवणींना उजाळा दिला.