DK Shivakumar Slaps A Congress Worker| देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र या दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानाखाली मारताना दिसत आहेत. भाजपने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये डीके शिवकुमार त्यांच्या शेजारी घोषणा देत असलेल्या एका व्यक्तीला कानाखाली मारतात. त्यानंतर डीके शिवकुमार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्या व्यक्तीला मागे ढकलतात. एका प्रचार कार्यक्रमादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते डीके, डीकेच्या घोषणा देत होते. त्यावेळी येथे लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.
नेमकं काय घडलं?
यावेळी एका काँग्रेस कार्यकर्त्याने डिके शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा शिवकुमार यांना राग आला आणि ते नाराज झाले. धक्कादायक म्हणजे शिवकुमार यांना राग अनावर झाल्याने ते थेट कार्यकर्त्याच्या कानाखाली मारतात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Karnataka’s DCM, DK Shivakumar, slaps Congress Municipal Member Allauddin Maniar, while campaigning in Savanur town of Haveri. This is not the first time DK has assaulted a Congress worker.
His crime? He happened to put his hands on DK Shivakumar’s shoulder, when the latter… pic.twitter.com/meDwwr0zRz
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 5, 2024
भाजप नेते अमित मालवीय ट्वीट
भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ टि्वट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी हावेरीच्या सावनूर शहरात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नगर परिषदेचे सदस्य अलाउद्दीन मनियार यांच्या कानाखाली मारली. डीके शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण करण्याची ही पहिली वेळ नाही. त्याचा गुन्हा काय होता?” त्याचा गुन्हा काय होता असा सवाल देखील मालवीय यांनी केला आहे.
पुढे मालवीय यांनी लिहिले की, “डीके शिवकुमार कारमधून बाहेर पडले होते, त्यावेळी त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. मला आश्चर्य वाटतं, काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेससाठी काम का करायचय? त्यांचे नेते त्यांच्या कानाखाली मारतात, त्यांचा अपमान करतात. निवडणूक लढवण्यासाठी त्यांना तिकिट देत नाहीत. स्वाभिमान नाही का?” असेही अमित मालवीय यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
कोण आहेत डीके शिवकुमार?
डीके शिवकुमार यांचे पूर्ण नाव दोड्डालहल्ली केम्पेगौडा शिवकुमार आहे. शिवकुमार यांना कर्नाटकातील वोक्कालिगा जातीचा प्रमुख चेहरा मानले जाते. राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी ते एक आहेत. डीके शिवकुमार आठ वेळा आमदार झाले आहेत. मागील वेळेस झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाचे श्रेय हे डीके शिवकुमार यांना दिले जाते.
हेही वाचा:
शेवटच्या क्षणी धनंजय सिंह यांच्या पत्नीचे तिकीट कापले ; बसपने जौनपूरमधून पुन्हा उमेदवार बदलला