Sanjay Nirupam Join Shivsena| संजय निरुपम यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश केला आहे. 2005 साली त्यांनी शिवसेना सोडली होती. त्यानंतर आता 20 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा हाती धनुष्यबाण घेतलं आहे. संजय निरुपम यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा काल शिवसेनेत प्रवेश झाला. दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल अखेर त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
संजय निरुपम यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “मी आज खूप आनंदी आहे. 20 वर्षानंतर स्वगृही परत येत आहे आणि एकटा नाही, तर संपूर्ण कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचाराने काम करण्यात अडचण येत होती पण आता ती अडचण दुर झाली आहे,” असे निरुपम म्हणाले. तसेच उमेदवारीची अपेक्षा होती, पण आता शिंदे आणि महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार असल्याचेही निरुपम यांनी सांगितले.
काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यावर कारवाई Sanjay Nirupam Join Shivsena|
दरम्यान, संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण ठाकरे गटाने याअमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संजय निरुपम नाराज होते. अनेकदा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसने आघाडी धर्माचं पालन न केल्याने पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याचे सांगत त्यांचे 6 वर्षांसाठी निलंबन केले.
2005 मध्ये शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश Sanjay Nirupam Join Shivsena|
संजय निरुपम यांनी 2005 मध्ये शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षात अनेक पदांवर त्यांननी काम केलं आहे. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी 2009 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी निरूपम यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.