Bomb Blast in Hooghly । पश्चिम बंगालमधील हुगळीत आज एक मोठी दुर्घटना घडली. हुगळीच्या पांडुआमध्ये झालेल्या स्फोटात चिमुरड्याचा मृत्यू झाला. या अपघातात तीन मुले जखमी झाली आहेत. मुलांनी खेळता खेळता बॉल समजून बॉम्ब उचलला अन् हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बाँम्ब हातात घेतल्यानंतर बॉम्बचा स्फोट झाला.
बॉल समजून उचलला बॉम्ब Bomb Blast in Hooghly ।
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लहान मुले खेळत असताना त्यांनी बॉल समजून बॉम्ब उचलला. त्यानंतर मग तो फुटला. तेथे खेळणाऱ्या अनेक मुलांना स्फोटाचा तडाखा बसला. मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी 11 वर्षीय राज विश्वासला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर एका मुलाला त्याचा हात गमवावा लागला.
पांडुआ हा हुगळी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. येथून भाजपचे उमेदवार लॉकेट चॅटर्जी घटनास्थळी रवाना झाले. या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर लॉकेट चॅटर्जीही आंदोलन करत आहेत. जोपर्यंत चौकशीचा आदेश मिळत नाही, तोपर्यंत ते आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पांडुआच्या तिन्ना नेताजीपल्ली कॉलनीत तलावाच्या काठावर अनेक मुले खेळत होती. अचानक स्थानिक लोकांना स्फोटाचा आवाज आला. तिथे जाऊन पाहिलं तर अनेक मुले या स्फोटात भाजली गेली होती. यानंतर लोकांनी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनास्थळी बॉम्ब कोणी ठेवला? Bomb Blast in Hooghly ।
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही दाखल झाला. घटनास्थळी बॉम्ब कोणी ठेवला? याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. मृत बालक हा पल्ला, बर्दवान येथील रहिवासी आहे. तो काकांच्या घरी आला होता. रुपम वल्लभ आणि सौरभ चौधरी अशी जखमी मुलांची नावे आहेत.
हुगळीत हा बॉम्बस्फोट अशा वेळी झाला जेव्हा येथे काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. हुगळीच्या जागेवर पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. लॉकेट चॅटर्जी हे येथून विद्यमान खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या रत्ना जे यांचा पराभव केला. यावेळीही भाजपने हुगळीतून लॉकेट चॅटर्जी यांना तिकीट दिले आहे.