नगर – करोना महामारीच्या संकटकाळात चोखपणे आपले कर्तव्य बजाविणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना विश्व मानवाधिकार परिषदच्या वतीने करोना योध्दा सन्मान प्रदान करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी परप्रांतीय मजुरांची घर वापसी करताना अत्यंत चोख पध्दतीने भूमिका बजावली. नियमाचे पालन करुन तर आर्थिक परिस्थिती अभावी शहरात अडकून पडलेल्या परप्रांतीयांना स्वखर्चाने घरी जाण्यास मदत केली.
त्यांच्या या प्रशासकीय व सामाजिक कार्याची दखल घेत विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.आर. अन्सारी यांनी स्वत: त्यांना करोना योध्दाचे मानपत्र पाठविले. हे मानपत्र पाटील यांना प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक नवेद शेख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सलिम मुन्शी, जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अल्ताफ शेख, बाबासाहेब सानप, सरफराज खान आदीसंह सदस्य उपस्थित होते.